‘सिकंदर’ चित्रपट तुम्हाला कसा वाटला? सलमान खानचे वडील सलीम खान म्हणाले, “एक-एक सीननंतर…”
सलमान खानचा बहुचर्चित 'सिकंदर' चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. ३० मार्चला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी 'सिकंदर' सज्ज झाला आहे. भाईजानच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. दोन वर्षांनंतर सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. त्यामुळे सध्या 'सिकंदर'ची क्रेझ दिसत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, हा चित्रपट 'शोले' लेखक व सलमान खानचे वडील सलीम खान यांना कसा वाटला? घ्या जाणून…