Salim Khan : “सलमानने कशासाठी माफी मागायची? त्याने काळवीट…”; सलीम खान नेमकं काय म्हणाले?
अभिनेता सलमान खानवर काळवीट शिकार केल्याचा आरोप आहे आणि त्याला धमक्या मिळत आहेत. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली. सलीम खान यांनी सलमानने काळवीटाची शिकार केलेली नाही असे सांगितले. सलमानला माफी मागण्याचा प्रश्न येतोच कुठे? असा प्रश्न त्यांनी विचारला. सलीम खान यांनी सलमान निर्दोष आहे असंही म्हटलं आहे. तसंच त्याला येणाऱ्या धमक्या या खंडणीसाठी आहेत असाही आरोप केला.