‘सिकंदर’ चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित, ५९ वर्षीय भाईजानने केला जबरदस्त डान्स
सलमान खानच्या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘सिकंदर’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या वर्षी ‘सिकंदर’ चित्रपटाची घोषणा झाली. तेव्हापासून सलमान खानच्या या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दोन टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सध्या ‘सिकंदर’मधील गाण्यांचा धुमाकूळ सुरू आहे. नुकतंच या चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात पुन्हा एकदा सलमान खान व रश्मिका मंदानाची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. एवढंच नाहीतर ५९ वर्षीय सलमानने जबरदस्त डान्स केला आहे.