“इंसाफ नहीं, साफ करने आया हूं”, सलमानच्या बहुचर्चित ‘सिकंदर’चा नवा धमाकेदार टीझर प्रदर्शित
Salman Khan Movie Sikandar New Teaser : सध्या सलमान खानच्या चाहत्यांचं लक्ष ‘सिकंदर’ चित्रपटाकडे लागून राहिलं आहे. ए.आर.मुरुगदॉस दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपट ईदचं औचित्य साधून प्रदर्शित होणार आहे. बहुचर्चित, बहुप्रतीक्षित या चित्रपटाची सलमानचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘सिकंदर’ चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदात सलमान खान आणि रश्मिका मंदानाची जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नुकताच ‘सिकंदर’ चित्रपटाचा दुसरा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये सलमान आणि रश्मिकाची केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे.