मुहूर्त ठरला! सलमान खानचा बहुचर्चित ‘सिकंदर’ चित्रपट ‘या’ प्रदर्शित होणार
ए.आर.मुरुगदॉस दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. १८ मार्चला ‘सिकंदर’ चित्रपटाचं नवं गाणं प्रदर्शित झालं. या चित्रपटातील नव्या गाण्याचं नाव ‘सिकंदर नाचे’ असं असून यामध्ये ५९ वर्षीय सलमान खानने जबरदस्त डान्स केला आहे. तसंच यामध्ये भाईजान व रश्मिका मंदानाची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ‘सिकंदर नाचे’ या गाण्यामुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.