सलमान खानच्या हाती राम मंदिराचं चित्र असलेलं घड्याळ, मौलानांचा इशारा; “कयामत के दिन…”
अभिनेता सलमान खानचा "सिकंदर" चित्रपट रमजान ईदला प्रदर्शित होतो आहे. प्रमोशनदरम्यान सलमानने राम मंदिराचं चित्र असलेलं ३४ लाख रुपयांचं घड्याळ घालून फोटो पोस्ट केले. यामुळे मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सलमानला शरियतचा सन्मान करून माफी मागण्याचा सल्ला दिला आहे.