‘सनम तेरी कसम’ने ‘तुंबाड’ला टाकलं मागे, १० दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
'सनम तेरी कसम' हा रोमँटिक चित्रपट ९ वर्षांनंतर पुन्हा रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. पहिल्यांदा फ्लॉप झालेला हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर ३६.१ कोटींची कमाई करत आहे. राधिक राव आणि विनय सप्रू यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने मूळ कलेक्शनपेक्षा चार पट जास्त कमाई केली आहे. हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.