“मला या आकड्यांपेक्षा…”, संतोष जुवेकरची ‘छावा’च्या कमाईबद्दलची पोस्ट चर्चेत!
संतोष जुवेकरने 'छावा' चित्रपटाच्या दोन दिवसांच्या कमाईचे आकडे शेअर करत एक पोस्ट केली आहे. 'छावा' चित्रपटाने दोन दिवसांत ७२.४ कोटी कमावले आहेत. संतोषने प्रेक्षकांचे आभार मानत, "माझ्या मायबाप प्रेक्षकांचा आकडा बघायला आवडेल," असे कॅप्शन दिले आहे. चाहत्यांनी संतोषच्या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि इतर कलाकारांच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे.