श्रद्धा कपूर-शक्ती कपूर यांनी मुंबईत खरेदी केले आलिशान अपार्टमेंट, मोजले तब्बल ‘इतके’ कोटी
'स्त्री २' च्या यशानंतर श्रद्धा कपूरने मुंबईत ६.२४ कोटी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट विकत घेतले आहे. हे अपार्टमेंट पिरामल महालक्ष्मी साऊथ टॉवरमध्ये असून त्याचा कार्पेट एरिया १०४२.७३ चौरस फूट आहे. श्रद्धाने तिचे वडील शक्ती कपूर यांच्यासोबत हे अपार्टमेंट घेतले आहे. यापूर्वी तिने जुहू येथे ६ लाख रुपये दरमहा भाड्याने अपार्टमेंट घेतले होते.