“हिंदू धर्माचा रक्षक कोणी बनवलं?” शत्रुघ्न सिन्हा यांनी मुकेश खन्नांची पात्रता काढली
शत्रुघ्न सिन्हा यांनी मुकेश खन्ना यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. २०१९ मध्ये 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सोनाक्षीला रामायणसंदर्भात प्रश्नाचं उत्तर आलं नव्हतं, यावरून मुकेश खन्ना यांनी तिच्या वडिलांच्या संस्कारांवर प्रश्न उपस्थित केले होते. शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या मुलांचा अभिमान व्यक्त केला. तसेच सोनाक्षीला रामायणाचं उत्तर देता आलं नाही याचा अर्थ ती चांगली हिंदू नाही, असा होत नाही असं स्पष्ट केलं.