“जवानमध्ये काम करणं हा सर्वात वाईट अनुभव”, अभिनेता असं का म्हणाला?
शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याने १००० कोटींहून जास्त कमाई केली होती. अभिनेता विराज घेलानीने या चित्रपटातील अनुभव वाईट असल्याचे सांगितले. त्याने १० दिवस उन्हात शूटिंग केले, पण त्याचा बराचसा भाग चित्रपटात वापरला गेला नाही, असंही तो म्हणाला.