श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली! लग्नाबद्दल म्हणाली…
अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला आहे. 'स्त्री २' च्या यशानंतर श्रद्धाने ती रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली, मात्र बॉयफ्रेंडचे नाव उघड केले नाही. तिला त्याच्यासोबत वेळ घालवायला आवडते, चित्रपट पाहणे, जेवायला जाणे आणि प्रवास करणे आवडते. लग्नाबद्दल विचारल्यावर श्रद्धा म्हणाली, ज्यांना लग्न करावं वाटतं त्यांचा निर्णयही चांगला आहे आणि ज्यांना नाही करायचं तेही छान आहे.