‘सिकंदर’ चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस मोठी घट, सहाव्या दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई
सध्या सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाची खूप चर्चा रंगली आहे आणि चर्चेच कारण आहे प्रेक्षकांचा प्रतिसाद. ‘सिकंदर’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. सलमान खानचा हा चित्रपट प्रदर्शित होताच चार दिवसांत १०० कोटींचा आकडा पार करेल किंवा २०२५मधील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरले. पण, ‘सिकंदर’ प्रदर्शित झाल्यानंतरचं चित्र काहीस वेळ दिसत आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटासारखी बक्कळ कमाई ‘सिकंदर’ला करताना नाकीनऊ झाल्याचं दिसत आहे.