स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर दुसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात, पाहा फोटो
Prateik Babbar Wedding : दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील व अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा अभिनेता प्रतीक बब्बर लग्नबंधनात अडकला आहे. आज, १४ फेब्रुवारीला प्रतीकने गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. प्रतीक बब्बर व प्रिया बॅनर्जीच्या लग्नाचे फोटो आता समोर आले आहेत. मोठ्या थाटामाटात दोघांनी लग्न केलं आहे.