Video: स्मिता पाटीलचा मुलगा स्वतःच्याच लग्नात रडला; प्रतीकचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी दुसरं लग्न केलं. मुंबईत १४ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या या लग्नात प्रतीकच्या कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत प्रतीक हमसून रडताना दिसतो. त्याच्या पहिल्या पत्नी सान्या सागरसोबत २०१९ मध्ये लग्न झालं होतं, पण २०२३ मध्ये घटस्फोट झाला. प्रतीकच्या 'धूम धाम' चित्रपटाचा प्रीमियरही त्याच दिवशी झाला.