प्रतीक बब्बरने लग्नात वडिलांनाही बोलावलं नाही; सावत्र भावाने व्यक्त केली नाराजी, म्हणाला..
अभिनेता प्रतीक बब्बर, दिवंगत स्मिता पाटील व ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा, याने प्रिया बॅनर्जीबरोबर दुसरं लग्न केलं आहे. प्रतीकने कुटुंबियांना आमंत्रित न करता मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली. त्याचा सावत्र भाऊ आर्य बब्बर याने याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि कोणीतरी प्रतीकला कुटुंबाविरोधात भडकवत असल्याचं म्हटलं. प्रतीकचं पहिलं लग्न सान्या सागरशी झालं होतं, पण ते नातं टिकलं नाही.