स्मिता पाटील यांचा मुलगा करतोय दुसरं लग्न, लग्नाची तारीख आली समोर; होणारी पत्नी कोण?
दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील व ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा अभिनेता प्रतीक बब्बर लवकरच दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. प्रतीक आणि त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी विवाहबद्ध होणार आहेत. प्रतीकचं हे दुसरं लग्न असून, त्याचं पहिलं लग्न सान्या सागरशी झालं होतं. प्रतीक आणि प्रिया यांनी २०२३ च्या व्हॅलेंटाइन डे ला त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती.