रामायणसंदर्भातील प्रश्नावरून संस्कार काढणाऱ्या मुकेश खन्ना यांना सोनाक्षी सिन्हाचे उत्तर
सोनाक्षी सिन्हाला 'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये रामायणसंदर्भातील प्रश्नाचं उत्तर देता आलं नव्हतं, यावरून मुकेश खन्ना यांनी तिच्यावर टीका केली होती. खन्ना यांनी सोनाक्षीच्या वडिलांना दोष दिला होता. यावर सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर उत्तर देत, विसरणं मानवी स्वभाव आहे आणि खन्ना यांनी ही गोष्ट विसरून पुढे जावं, असं म्हटलं. तिने खन्ना यांना तिच्या कुटुंबावर टीका थांबवण्याचं आवाहन केलं.