सोनाक्षी सिन्हा भाऊ लव व कुशबद्दल म्हणाली, “ते मला मारायचे, त्यांना हेवा…”
जून २०२४ मध्ये सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी सात वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न केलं. हे लग्न खूप खासगी होतं, ज्यात फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. सोनाक्षीच्या आंतरधर्मीय लग्नात तिचे भाऊ लव आणि कुश अनुपस्थित होते, ज्यामुळे तणावाच्या चर्चा सुरू झाल्या. शत्रुघ्न सिन्हा यांनी मुलांच्या परिपक्वतेवर भाष्य केलं, तर लवने इन्स्टाग्रामवर आपली बाजू मांडली.