सरकारी योजनेतील लाभार्थ्यांच्या यादीत नाव आल्यावर सनी लिओनीचा संताप, म्हणाली…
बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या नावे छत्तीसगड सरकारच्या 'महतारी वंदन योजना' अंतर्गत बनावट खाते उघडून पैसे जमा करण्यात आले. या योजनेत विवाहित महिलांना दरमहा १००० रुपये दिले जातात. सनीने या फसवणुकीबद्दल संताप व्यक्त केला आणि चौकशीसाठी पूर्ण पाठिंबा दिला. बस्तरमधील अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला असून, तक्रार दाखल झाल्यास कारवाई होणार आहे.