सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट, रिया चक्रवर्तीला क्लिन चिट
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. या अहवालानुसार, सुशांतचा मृत्यू आत्महत्या आहे आणि त्यात कोणताही गुन्हेगारी अँगल नाही. रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चिट देण्यात आली आहे. सुशांतचा मृतदेह १४ जून २०२० रोजी आढळला होता. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी तपास केला, नंतर सर्वोच्च न्यायालयाने १९ ऑगस्ट २०२० रोजी सीबीआयला तपासाचे अधिकार दिले.