‘तुंबाड’ने ६ वर्षांपूर्वीच्या मूळ कलेक्शनला टाकलं मागे, एकूण कमाई किती?
मराठमोळे दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा 'तुंबाड' चित्रपट दुसऱ्यांदा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. २०१८ मध्ये फ्लॉप ठरलेल्या या चित्रपटाने आता सात दिवसांत १३.४१ कोटी रुपयांची कमाई केली आहे, जी मूळ कलेक्शनपेक्षा जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, 'तुंबाड' री-रिलीजमुळे २० कोटींहून जास्त कमाई करेल.