वरुण धवनने शेअर केला मुलीचा पहिला फोटो, दीपिका-रणवीरने मुलीसह ‘असा’ साजरा केला ख्रिसमस
बॉलीवूड सेलिब्रिटींनी ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. वरुण धवनने पहिल्यांदाच त्याच्या सहा महिन्यांच्या लेकीचा चेहरा दाखवला आहे. दीपिका पादुकोण व रणवीर सिंह यांनीही लेक दुआबरोबर ख्रिसमस साजरा केला. विकी कौशल-कतरिना कैफ, रणबीर कपूर-आलिया भट्ट, तृप्ती डिमरी, क्रिती सेनॉन व तिचा बॉयफ्रेंड कबीर बहिया, हृतिक रोशन व त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांनीही ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.