“छावामध्ये जखमांवर मीठ चोळताना…”, ‘कवी कलश’ साकारणाऱ्या अभिनेत्याचं वक्तव्य
विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने या वर्षातील सर्वाधिक कमाई केली आहे. चित्रपटात रश्मिका मंदाना, विनीत कुमार सिंह आणि अक्षय खन्ना यांच्या भूमिका आहेत. विनीतने छत्रपती संभाजी महाराजांच्या छळाच्या दृश्यांबद्दल सांगितले की, चित्रपटात दाखवलेला छळ खऱ्या घटनेच्या तुलनेत खूप सौम्य आहे. शूटिंगपूर्वी विनीतने संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली होती. डॉक्टर असलेल्या विनीतने छळाच्या वेदनांबद्दल आपला अनुभवही शेअर केला.