“ती माझी…”, रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन यांनी केलेलं वक्तव्य
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला ५० वर्षे झाली आहेत, पण अमिताभ यांचा उल्लेख झाला की रेखा यांचा विषय निघतोच. रेखा यांनी अनेकदा अमिताभ यांच्यावरील प्रेम व्यक्त केले आहे, परंतु अमिताभ यांनी कधीच ते स्वीकारले नाही. सिमी गरेवालच्या मुलाखतीत अमिताभ यांनी रेखाबद्दल विचारल्यावर तिला सहकलाकार म्हणून संबोधले. रेखा यांनी मात्र अमिताभ यांच्यावर प्रेम असल्याचे स्पष्ट केले.