बॉलीवूड अभिनेता पत्नीला म्हणतो, “…तर मी माधुरी दीक्षितशी लग्न केलं असतं”
बॉलीवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितचे चाहते जगभरात आहेत. अभिनेता गोविंदाने माधुरीचे कौतुक करत तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने सांगितले की, पत्नी सुनीताने नकार दिला असता तर त्याने माधुरीशी लग्न केलं असतं. गोविंदाने माधुरीच्या अभिनयाचे, स्वभावाचे आणि मैत्री निभावण्याच्या गुणांचे कौतुक केले.