“सुपरस्टार असशील तू तुझ्या घरी…”, मेहमूद यांनी राजेश खन्ना यांना सेटवर लगावलेली झापड
राजेश खन्ना हे ६०-७० च्या दशकातील सुपरस्टार होते, परंतु त्यांच्या अहंकारामुळे सेटवर उशिरा येण्याची सवय होती. 'जनता का हवालदार' चित्रपटाच्या सेटवर निर्माते मेहमूद यांनी त्यांना उशिरा येण्याबद्दल जाब विचारला, ज्यामुळे वाद झाला आणि मेहमूद यांनी खन्नांना थप्पड मारली. नंतर दोघांमधील मतभेद मिटले आणि चित्रपट पूर्ण झाला. 'जनता का हवालदार' १९७९ मध्ये रिलीज झाला.