४९ वर्षीय अक्षय खन्नाने लग्न का केलं नाही? म्हणालेला, “आयुष्यात खूप…”
अक्षय खन्ना सध्या 'छावा' चित्रपटातील औरंगजेबाच्या भूमिकेसाठी चर्चेत आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. अक्षय खन्ना अविवाहित असून, त्याने लग्न आणि मुलं दत्तक घेण्याबद्दल नकार दिला आहे. त्याला त्याच्या आयुष्यावर पूर्ण नियंत्रण हवं आहे आणि तो या गोष्टींसाठी तयार नाही.