Video: “ढगाला लागली कळ…”, हनी सिंगच्या आवाजात दादा कोंडकेंचं लोकप्रिय गाणं ऐकलंत का?
प्रसिद्ध रॅपर हनी सिंगने ( Honey Singh ) आपल्या दमदार आवाजाने श्रोत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्याचा प्रत्येक रॅप, गाणं सुपरहिट होतं असतं. हनी सिंग त्याच्या रॅप, गाण्यांमुळे जितका चर्चेत असतो. तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या हनी सिंगचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये हनी सिंग मराठीत संवाद साधताना दिसत आहे. एवढंच नाहीतर त्याने दादा कोंडकेंच्या लोकप्रिय गाण्यांचा दोन ओळी गायल्या आहेत. हनी सिंगचा या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.