करभरणा अधिक सुलभ होणार! क्लिष्ट पद्धतीपासून नोकरदारांची सुटका, सरकार नवं विधेयक…
करदात्यांकडून होणारा करभरणा हा देशाचा महत्त्वाचा महसूल स्त्रोत आहे. सध्याची करप्रणाली क्लिष्ट असल्यामुळे सामान्य नोकरदार वर्गाला करभरणा करणं अवघड होतं. यावर उपाय म्हणून केंद्र सरकार नवीन कर विधेयक मांडणार आहे. हे विधेयक केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात मांडलं जाईल. नवीन कायदा सध्याच्या आर्थिक परिस्थितीला अनुसरून असेल आणि ६३ वर्षांपूर्वीचा प्राप्तिकर कायदा बदलणार आहे.