अर्थसंकल्पात मखाणा उत्पादनावर भाष्य; पण मखाणा खाण्याचे नेमके फायदे काय जाणून घ्या
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत २०२५ चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच त्यांनी गरीब, शेतकरी आणि महिलांवर सरकारचा भर असल्याचे सांगितले. तसेच यावेळी ग्रामीण भागातील रोजगारासह भाजीपाला आणि फळांसाठी मोठी योजना प्रस्तावित आहे अशी घोषणा केली. याचवेळी त्यांनी देशातील मखाणा उत्पादनाला चालना देण्याबाबतही भाष्य केलं. यासाठी देशात मखाणा बोर्ड स्थापन करण्यात येईल अशी घोषणा केली. पण या मखाणाच्या सेवनाचे शरीरास नेमके कोणते फायदे मिळतात जाणून घेऊ…