आठव्या वेतन आयोगाची २०२७ पर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार? पण कारण काय?
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा फेरआढावा घेण्यासाठी आठवा वेतन आयोग २०२६ पासून लागू होणे अपेक्षित होते. मात्र, फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, याची अंमलबजावणी २०२७ पर्यंत लांबणीवर पडू शकते. आयोगाच्या शिफारशींना अंतिम रूप देण्यासाठी १५ ते १८ महिने लागतील. अंतिम अहवाल २०२६ च्या अखेरीस येईल, त्यामुळे सुधारित वेतन आणि पेन्शन २०२७ पासून लागू होईल.