आयफोनची किंमत २ लाख होणार? अमेरिकेच्या व्यापारी करामुळे अॅपलप्रेमींच्या खिशाला भुर्दंड!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २७ टक्के आयात शुल्क लादल्याने आयफोनच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. ॲपलने हा अतिरिक्त खर्च ग्राहकांवर लादल्यास आयफोन ३० ते ४० टक्क्यांनी महाग होऊ शकतो. आयफोन १६ मॉडेलची किंमत ४३ टक्क्यांनी वाढून ९७ हजारांपर्यंत जाऊ शकते. आयफोन १६ प्रो मॅक्सची किंमत २ लाखांपर्यंत पोहोचू शकते. वाढलेल्या किमतींमुळे ग्राहक सॅमसंगसारख्या इतर पर्यायांकडे वळू शकतात.