१ मे पासून ATM मधून पैसे काढणे होणार खर्चिक, RBI च्या नव्या नियमानुसार इतका चार्ज लागणार
देशात एटीएममधून पैसे काढण्याच्या शुल्कात वाढ होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएम इंटरचेंज शुल्क १७ रुपयांहून १९ रुपये करण्यास मंजूरी दिली आहे, हा बदल १ मे २०२५ पासून लागू होईल. त्यामुळे खातेधारकांना मोफत मर्यादेनंतर पैसे काढताना अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. यामुळे छोट्या बँकांवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.