पीएफ खातं हस्तांरित करणं होणार आता अधिक सोपं, EPFO ने आणलं नवं अपडेट; लगेच जाणून घ्या!
कंपनी बदलताना पीएफ खातं हस्तांतरित करणं आता सोपं झालं आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने फॉर्म १३ अपडेट केला आहे, ज्यामुळे पीएफ हस्तांतरण प्रक्रिया सुलभ झाली आहे. नवीन फॉर्म १३ मध्ये पीएफ व्याजाचे करपात्र आणि करपात्र नसलेले घटक वेगळे ओळखता येतील. EPFO ने आधार जोडणीशिवाय UAN जनरेट करण्याची सुविधा दिली आहे. या सुधारणा १.२५ कोटींहून अधिक सदस्यांना फायदा करतील.