फेक Gpay, PhonePe, Paytm ॲपमुळे वापरकर्ते त्रस्त; नोटिफिकेशन येतात, पण…
गेल्या काही दिवसांत सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ठगांनी युपीआयच्या माध्यमातून फसवणूक करण्यासाठी जीपे, फोनपे सारखी दिसणारी फेक ॲप्स तयार केली आहेत. या ॲप्सद्वारे फेक व्यवहाराचे नोटिफिकेशन येते, पण पैसे खात्यात जमा होत नाहीत. व्यवहार करताना ट्रांजेक्शन हिस्ट्री तपासा, घाईगडबड टाळा आणि अनोळखी ॲप्स वापरणे टाळा. व्यापाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करावे आणि व्यवहारांची नोंद ठेवावी.