१०० आणि २०० रुपयांच्या नोटांबाबत RBI ने घेतला महत्त्वाचा निर्णय, बँकांना दिले आदेश
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटा पुरेशा प्रमाणात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे लहान मूल्यांच्या नोटा सहज उपलब्ध होतील. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ७५% एटीएममध्ये आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत ९०% एटीएममध्ये या नोटा असतील. तसेच, १ मे २०२५ पासून दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढणे आणि शिल्लक तपासणे महाग होणार आहे.