‘भारताचा GDP वेगाने वाढतोय, २०२५ साली जपान आणि २०२७ जर्मनीला मागे टाकेल’, IMF ची माहिती
मागील दहा वर्षांत भारताचा जीडीपी जवळपास दुप्पट झाला आहे. २०१५ साली २.१ ट्रिलियन डॉलर असलेला जीडीपी २०२५ साली ४.३ ट्रिलियन डॉलरवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार, भारत आता जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जपानला मागे टाकून भारत चौथ्या क्रमांकावर येण्याच्या जवळ आहे. तर लवकरच जर्मनीलाही भारत मागे टाकेल, अशीही माहिती IMF कडून देण्यात आली आहे.