सेन्सेक्स ११०० अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी गायब
गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात निरुत्साह दिसत असून, सेन्सेक्स आणि निफ्टी घसरत आहेत. सोमवारी मोठी घसरण झाल्यानंतर मंगळवारीही बाजाराची सुरुवात निराशाजनक झाली. सेन्सेक्स १,१०६ अंशांनी आणि निफ्टी ३४९ अंशांनी घसरले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टिल आणि अल्युमिनियमवरील आयात शुल्क वाढवले, तसेच विदेशी वित्त संस्थांनी भारतीय बाजारातून गुंतवणूक काढून घेतल्याने बाजारावर परिणाम झाला आहे.