वयाच्या १० व्या वर्षी विकलं दूध; पण आज बक्कळ पैसा, तीर्थानंद सिंग यांची प्रेरणादायी गोष्ट
भारतातील अनेक तरुण आणि मध्यमवयीन लोक नोकरी करून आपला उदरनिर्वाह भागवतात. दरम्यान, या सगळ्या धकाधकीच्या जीवनात काही लोक असे आहेत, ज्यांच्याकडे व्यवसाय करण्याची क्षमता असते आणि त्या क्षमतांचा वापर करून ते लाखो रुपये कमवण्यात यशस्वी होतात. बिहारमधील दूध विक्रेता तीर्थानंद सिंग यांची प्रेरणादायी गोष्टदेखील काही अशीच आहे. तीर्थानंद सिंग यांनी वयाच्या १० व्या वर्षी दूध विकायला सुरुवात केली आणि आजही वयाच्या ७० पेक्षा जास्त वयात ते दूध विकत आहेत.