MPSC च्या विद्यार्थ्यांना खूशखबर! कमाल वयोमर्यादेत वाढ; जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?
राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध पदांच्या भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ही शिथिलता लागू असेल. या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नियोजित वेळापत्रकात विलंब झाल्याने ही शिथिलता देण्यात आली आहे.