Bihar IT engineer got 2 crore package at google company read abhishek kumar
1 / 30

बिहारमधील लहानशा गावात राहणाऱ्या तरुणाला मिळाली गुगलमध्ये नोकरी अन् २ कोटींचं पॅकेज

बिहारमधील जमुई जिल्ह्यातील एका संगणक अभियंत्यानं गूगलच्या लंडन ऑफिसमध्ये ₹ २ कोटींचं पॅकेज मिळवलं आहे. एनआयटी पाटणामधून बी.टेक. पूर्ण केलेला अभिषेक कुमार ऑक्टोबरमध्ये त्याच्या या नव्या कारकि‍र्दीला सुरुवात करणार आहे.

Swipe up for next shorts
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli And Arbaz Patel in Danger zone, janhvi, suraj varsha usgaonkar safe
2 / 30

घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव ऐकताच निक्कीचा फुटला टाहो, ‘हे’ सदस्य झाले सेफ, पाहा प्रोमो

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात शनिवारी 'भाऊच्या धक्क्या'वर 'महाराष्ट्राचा धक्का' पाहायला मिळाला. रितेश देशमुखच्या अनुपस्थितीत डॉ. निलेश साबळेची एन्ट्री झाली. पत्रकार परिषदेत सदस्यांनी सणसणीत प्रश्नांची उत्तरे दिली. संग्राम चौगुले वैद्यकीय कारणास्तव बाहेर पडला. आज एलिमिनेशन प्रक्रिया पार पडणार आहे. घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव ऐकताच निक्की तांबोळी ढसाढसा रडताना दिसत आहे. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे.

Swipe up for next shorts
Rohit Sharma Statement on India Win and Rishabh Pant IND vs BAN 1st Test
3 / 30

विजयानंतर ऋषभ पंतविषयी बोलताना रोहित शर्मा झाला भावुक, म्हणाला, “त्या कठीण काळात…”

भारताने बांगलादेशविरुद्ध चेन्नईच्या चेपॉक मैदानावर पहिला कसोटी सामना २८० धावांनी जिंकला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, हा विजय आगामी कसोटी मालिकांसाठी महत्त्वाचा आहे. ऋषभ पंतच्या शतकाबद्दल रोहितने त्याच्या पुनरागमनाचे कौतुक केले. रोहितने चेन्नईच्या खेळपट्टीवर संयमाची गरज असल्याचे सांगितले. तसेच, रविचंद्रन अश्विनच्या उत्कृष्ट कामगिरीचेही कौतुक केले.

Swipe up for next shorts
Kiran Mane Exit From tikali Serial now appear new colors marathi serial
4 / 30

किरण मानेंनी सोडली ‘तिकळी’ मालिका, आता झळकणार ‘कलर्स मराठी’वाहिनीवर; पोस्ट करत म्हणाले…

अभिनेते आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी किरण माने नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट या कायम व्हायरल होतं असतात. सध्या ते ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तिकळी’ मालिकेत पाहायला मिळत होते. पण त्यांनी या मालिकेला आता रामराम केल्याचं समोर आलं आहे. किरण मानेंनी स्वतः यासंदर्भात पोस्ट लिहून चाहत्यांना माहिती दिली आहे.

IND vs BAN Team India squad announced for 2nd test match
5 / 30

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर! कोणत्या खेळाडूंना मिळाली संधी?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत पार पडला, ज्यात भारताने २८० धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दुसरा सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये होणार आहे. बीसीसीआयने दुसऱ्या सामन्यासाठी पहिल्या सामन्यातीलच संघ कायम ठेवला आहे. जसप्रीत बुमराह, यश दयाल, आकाश दीप, सर्फराझ खान आणि ध्रुव जुरेल यांचा संघात समावेश आहे.

Masaba Gupta shared what she eats in a day
6 / 30

कोमट पाण्यात बडीशेप, जिरे घालून पिणे गर्भवती महिलांसाठी योग्य आहे का? वाचा तज्ज्ञांचे मत

प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक आणि फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता गरोदर आहे. तिने तिच्या गरोदरपणातील आहाराची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या आहारात धान्य, फळे, भाज्या, मांस, दुग्धजन्य पदार्थ, नट्स आणि आरोग्यदायी तेलांचा समावेश आहे. आहारतज्ज्ञ रेचेल दीप्ती यांनी सांगितले की, गरोदरपणात प्रथिनांची गरज वाढते आणि संतुलित आहार महत्त्वाचा आहे. डॉक्टरांनी गर्भवती महिलांसाठी नक्की काय काय सांगितलं आहे जाणून घेऊ या.

Chess Olympiad Nona Gaprindashvili Cup given to India at Chennai 2022 goes missing by Indian Chess Federation
7 / 30

ऑलिम्पियाड फिरता करंडक भारताकडून गहाळ,बुद्धिबळ महासंघाची बेफिकिरी

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील सर्वोत्तम सांघिक कामगिरीसाठी देण्यात येणारा नोना गाप्रिंदाश्वाली फिरता करंडक भारताने दोन वर्षांपूर्वी जिंकला होता, परंतु आता तो हरवला आहे. जागतिक बुद्धिबळ महासंघाने करंडक परत करण्याची आठवण केल्यावर शोधाशोध सुरू झाली, पण अपयश आले. भारतीय बुद्धिबळ महासंघाने पोलिस तक्रार केली असून, पर्यायी करंडक तयार करण्याचे ठरवले आहे. ही परिस्थिती लाजीरवाणी असल्याचे महासंघाने मान्य केले आहे.

WTC Points Table India Leads With Huge Margin of 71 percentage Bangladesh Slips From 4th to 6th Place
8 / 30

WTC Points Table मध्ये भारताला मोठा फायदा, पराभवामुळे बांगलादेशला फटका

भारतीय संघाने २०२४ मधील घरच्या मैदानावरील हंगामाची दणक्यात सुरूवात केली आहे. चेन्नई कसोटीत भारताने बांगलादेशचा २८० धावांनी पराभव केला, जो धावांच्या बाबतीत बांगलादेशविरुद्धचा सर्वात मोठा विजय आहे. या विजयामुळे भारताने WTC गुणतालिकेत ७१.६७ टक्के गुणांसह आघाडी घेतली आहे. बांगलादेशचा पराभव झाल्यामुळे त्यांची टक्केवारी ३९.२८ झाली आहे. श्रीलंका आणि इंग्लंडला याचा फायदा झाला आहे.

Sonali Patil expressed her displeasure over the talk of Bigg Boss Marathi season 5 will off air in 70 days
9 / 30

‘बिग बॉस मराठी’ बंद होणार असल्याच्या चर्चेवर सोनाली पाटीलने व्यक्त केली नाराजी, म्हणाली…

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात पहिल्या दिवसापासून गाजत आहे. रितेश देशमुखच्या 'भाऊच्या धक्क्या'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शोचा टीआरपी देखील वाढत आहे. मात्र, हे पर्व ७० दिवसांत बंद होणार असल्याची चर्चा आहे. अभिनेत्री सोनाली पाटीलने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Suicide Work Pressure
10 / 30

कामाच्या अतिताणाचा आणखी एक बळी; सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या!

कामाच्या अतिताणामुळे पुण्यात एका २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आईने केला आहे. चेन्नईतही कार्तिकेयन नावाच्या तरुणाने आत्महत्या केली. तो सॉफ्टवेअर कंपनीत तंत्रज्ञ होता आणि नैराश्यामुळे उपचार घेत होता. त्याच्या पत्नीला घरी परतल्यावर त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Devendra Fadnavis post on International Daughters day 2024
11 / 30

आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त देवेंद्र फडणवीसांची पोस्ट; लेकीला म्हणाले…

आज आंतरराष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जात आहे. मुलींचं कौतुक व्हावं याकरता हा दिन साजरा होतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लेकीला शुभेच्छा देत फोटो शेअर केला. जितेंद्र आव्हाड यांनीही आपल्या मुलीचा जुना फोटो शेअर केला. मुलींचा जन्म साजरा करून त्यांना सक्षम करण्याचं आवाहन करण्यात आलं. दिविजा फडणवीस सध्या शाळेत शिकत असून सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेते.

Chandrababu Naidu
12 / 30

“लाडूविषयी मी बोलावं अशी देवाची इच्छा असेल”, चंद्राबाबू नायडू यांचं विधान चर्चेत!

आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या तुपात माशांच्या तेलाचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. या आरोपामुळे राज्यात राजकारण तापले आहे. नायडू म्हणाले की, परमेश्वराची इच्छा होती की मी हे सत्य उघड करावे. त्यांनी तुपाच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्यांना राज्य सरकार सोडणार नाही, असा इशाराही दिला.

IND vs BAN Why does Shakib Al Hasan chew black thread
13 / 30

शकीब अल हसन फलंदाजी करताना काळा धागा का चघळतो? दिनेश कार्तिकने सांगितले कारण

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशला ५१५ धावांचे लक्ष्य दिले आहे. बांगलादेशने तिसऱ्या दिवसाअखेर ४ बाद १५८ धावा केल्या होत्या. शकीब अल हसन फलंदाजी करताना काळा धागा चघळताना दिसला. दिनेश कार्तिकने म्हणलाल, तमीम इक्बालच्या सांगितले की, हा धागा चघळल्याने शकीबला एकाग्रता राखण्यास मदत होते.

Chess Olympiad 2024 India Mens Team Creates History Will Win 1st Ever Gold Medal D Gukesh
14 / 30

चेस ऑलिम्पियाडमध्ये भारतीय पुरूष संघाची ऐतिहासिक कामगिरी, पहिले सुवर्णपदक केले निश्चित

भारताचा बुद्धिबळ संघ बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ मध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकण्याच्या मार्गावर आहे. डी गुकेशने यूएसएच्या फॅबियानो कारुआनाचा पराभव करून भारतीय पुरुष संघाचे सुवर्णपदक जवळजवळ निश्चित केले. महिला संघाने चीनचा पराभव करून दुसरे स्थान मिळवले. दिव्या देशमुख आणि आर वैशाली यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय महिला संघ सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार ठरले आहेत.

marathi actress shruti marathe serial bhumikanya off air
15 / 30

श्रुती मराठेच्या मालिकेने अवघ्या तीन महिन्यात घेतला प्रेक्षकांचा निरोप, अचानक झाली बंद

मराठी मालिकाविश्वात सध्या अनेक मालिका अचानक बंद होत आहेत. 'सोनी मराठी'वरील 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' आणि 'भूमिकन्या' या दोन मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांची निर्मिती असलेल्या 'भूमिकन्या' ९३ भागांनंतर बंद झाली आहे. यासंदर्भात मालिकेतील अभिनेता मिलिंद अधिकारीने भावुक पोस्ट लिहिली आहे.

Ajit Pawar over Ladki Bahin Yojana
16 / 30

तुमच्या वडिलांची योजना आहे का?” अजित पवारांचा काँग्रेसवर संताप

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, ज्याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. जुलैपासून सुरू झालेल्या या योजनेत दीड कोटीहून अधिक महिला पात्र ठरल्या आहेत. मात्र, महाविकास आघाडीने योजनेवर टीका केली असून काँग्रेसने ती बंद करण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

Eknath Khadse
17 / 30

“मी राष्ट्रवादी कधीही सोडली नव्हती”, एकनाथ खडसेंचा दावा!

भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय मागे घेतला आहे. जामनेरमध्ये आयोजित सभेत खडसे म्हणाले की, त्यांनी राष्ट्रवादी कधीच सोडली नव्हती. भाजपाने त्यांना आमंत्रण दिले होते, परंतु त्यांनी भाजपात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली नव्हती. खडसे यांनी जामनेरमध्ये परिवर्तनाची गरज असल्याचे सांगितले आणि ही सभा खऱ्या अर्थाने परिवर्तन सभा असल्याचे म्हटले.

Aarya Jadhao met Yogita Chavan
18 / 30

Video: बिग बॉसने घराबाहेर काढल्यावर आर्याने घेतली पाचव्या पर्वातील योगिताची भेट

मागच्या आठवड्यात बिग बॉसने आर्या जाधवला निक्कीला मारल्यामुळे घराबाहेर काढलं. अमरावतीत तिचं जल्लोषात स्वागत झालं. मुंबईत परतल्यावर आर्याने बिग बॉसच्या पाचव्या पर्वातील स्पर्धक योगिता चव्हाणची भेट घेतली. दोघींच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

IND vs BAN 1st Test Day 3 Stumps Early by Umpires Due Bad Light
19 / 30

भारत बांगलादेश कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ पंचांनी लवकर का संपवला?

भारत वि बांगलादेश पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने ५१३ धावांचे आव्हान दिले. चेन्नईतील खराब हवामाना आणि खराब प्रकाशामुळे सामना थांबवावा लागला. बांगलादेशने ४ बाद १५८ धावा केल्या होत्या. भारताकडून अश्विनने ३ आणि बुमराहने १ विकेट घेतली. पंत आणि गिलच्या शतकांच्या जोरावर भारताने मोठी धावसंख्या गाठली. तिसरा दिवस भारताच्या नावे राहिला.

Eknath shinde MP Prataprao jadhav over Light bill
20 / 30

“आम्ही तीन पिढ्या वीजबिल भरलं नाही”, शिंदे गटाच्या खासदाराचं विधान चर्चेत

राज्य सरकारने जुलै महिन्यात शेतकऱ्यांना वीज बिले माफ करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. मात्र, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी वादग्रस्त विधान केले की, त्यांच्या तीन पिढ्यांनी वीज बिले भरली नाहीत. सरकारने लाखो रुपयांची वीज बिले माफ केली असून, शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळणार आहे. सध्या ४६ लाख कृषीपंपांना मोफत वीज पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.

Anita Hassanandani Reveals Auto Driver Unzipped His Pants
21 / 30

“एक रिक्षावाला त्याची पॅन्ट काढायचा अन्…”, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

अनिता हसनंदानी ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिने एका मुलाखतीत शाळेत असताना आलेला धक्कादायक अनुभव सांगितला. ९-१० वर्षांची असताना एक रिक्षावाला विक्षिप्तपणे वागायचा. रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींकडे बघून अश्लील कृत्य करायचा, त्यामुळे तिने शाळेचा रस्ता बदलला होता, असंही तिने सांगितलं.

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli and Janhvi Killekar fight in front of journalits
22 / 30

निक्की जान्हवीला घाबरते का? असं विचारताच दोघी पत्रकारांसमोर भांडल्या; एक म्हणाली…

Bigg Boss Marathi Season 5 : आज 'भाऊच्या धक्क्या'वर सर्व सदस्यांना मोठे धक्के बसणार आहेत. रितेश देशमुखकडून नाही तर पत्रकारांच्या प्रश्नातून धक्के बसणार आहेत. पत्रकारांच्या या 'महाराष्ट्राच्या धक्क्या'वर बेधडक प्रश्नांमुळे अनेक खुलासे देखील होणार आहेत. या 'महाराष्ट्राच्या धक्क्या'वरील एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये एका प्रश्नावरून पत्रकारांसमोर निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकरमध्ये भांडताना दिसत आहेत.

Virat Kohli ask Rohit Sharma if he eats soaked almonds or not soaked almonds benefits for memory and health
23 / 30

सकाळी भिजवलेले बदाम खातोस का? रोहित शर्माच्या विसरभोळेपणावर विराट कोहलीचा मजेशीर प्रश्न

जेव्हा गौतम गंभीर यांनी विराट कोहलीला विचारलं की, "आता जेव्हा मी रोहित शर्माची मुलाखत घेईन तेव्हा मी त्याला नेमका कोणता प्रश्न विचारावा असं तुला वाटतं?" यावर विराट म्हणाला, "मला असं वाटतं की, एकदम साधा सोपा प्रश्न तुम्ही रोहितला विचारू शकता, तो म्हणजे सकाळी सकाळी भिजत घातलेले बदाम तू खातोस की नाही?

भारताचा टेस्ट आणि ओडीआयचा कॅप्टन रोहित शर्मा, त्याच्या विस्मरणामुळे अनेकदा चर्चेत असतो. या हलक्याफुलक्या विनोदातून एक संकेत घेऊन, भिजवलेले बदाम खरोखरच स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात का, याचा शोध घेतला.

Atishi AAP leader takes oath as Chief Minister of Delhi
24 / 30

“मैं आतिशी..”, मुख्यमंत्रिपदी आतिशी विराजमान! दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री!

आतिशी मार्लेना यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांनी १७ सप्टेंबरला राजीनामा दिल्यानंतर आतिशी यांची एकमताने निवड झाली. २१ सप्टेंबरला उपराज्यपालांनी त्यांना शपथ दिली. आतिशी या दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून इतिहासाची मास्टर्स पदवी घेतली आहे. २०१९ पासून सक्रिय राजकारणात असलेल्या आतिशी यांनी कालकाजी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

Organs Death Time body changes after death
25 / 30

मृत्यूनंतर कोणता अवयव किती वेळ जिवंत असतो? यावेळी शरीरात नेमके कोणते बदल होतात? वाचा

हेल्थ September 21, 2024

जन्माबरोबर प्रत्येक माणसाचा मृत्यूही ठरलेला असतो. कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह जाळला जातो किंवा त्यावर अंत्यसंस्कार केले जातात किंवा दफन केले जाते. पण, तुम्हाला माहिती आहे का, माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातील काही अवयव हे काही तास जिवंत राहतात. पण, मृत्यूनंतर कोणते अवयव किती मिनिटे किंवा तास जिवंत असतात याच विषयावर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना काही तज्ज्ञ डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली ती आपण जाणून घेऊ..

nitin gadkari
26 / 30

“राजाने विरोधी विचार सहन केले पाहिजेत हीच लोकशाहीची परीक्षा”, नितीन गडकरींचा रोख कुणाकडे?

पुणे September 21, 2024

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी लोकशाहीत राजाने प्रखर विचार सहन करावेत असे सांगितले. गडकरींनी धर्मनिरपेक्षतेचा अर्थ सर्वधर्मसमभाव असा स्पष्ट केला. भारतीय संस्कृतीत सहिष्णुता आणि विश्वकल्याण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. गडकरींनी व्यक्ती धर्म, भाषा, प्रांतामुळे नव्हे तर कर्तृत्वाने मोठा होतो असेही सांगितले.

Shibani Dandekar opens up about interfaith marriage with Farhan Akhtar
27 / 30

घटस्फोटित फरहान अख्तरशी आंतरधर्मीय लग्न केल्यावर मराठमोळी शिबानी झालेली ट्रोल, म्हणाली…

बॉलीवूड September 21, 2024

मराठमोळी शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर कामाच्या निमित्ताने भेटले, प्रेमात पडले आणि २०२२ मध्ये आंतरधर्मीय लग्न केलं. फरहानशी लग्न केल्यावर ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं, असं शिबानीने सांगितलं. सोशल मीडियावरील कमेंट्सवर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेवावा, असं ती म्हणाली. लोकांनी दोघांचे धर्म वेगवेगळे असल्याने खूप ट्रोल केलं, असंही तिने नमूद केलं.

Amar Preet Singh
28 / 30

IAF च्या प्रमुखपदी एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची नियुक्ती

देश-विदेश September 21, 2024

एअर मार्शल अमर प्रीत सिंग हे ३० सप्टेंबर रोजी भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. सध्या ते हवाई दलाचे उपप्रमुख आहेत. त्यांनी ५,००० तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव घेतला आहे आणि विविध कमांड, कर्मचारी, निर्देशात्मक आणि परदेशी नियुक्त्यांमध्ये काम केले आहे. त्यांनी मिग-२९ अपग्रेड प्रोजेक्टचे नेतृत्व केले आणि तेजस लढाऊ विमानाच्या उड्डाण चाचणीचे काम केले आहे.

Prajakta Mali and Gashmeer Mahajani Starr Phullwanti Movie Teaser out
29 / 30

“नजर साफ असेल…”, प्राजक्ता माळी-गश्मीर महाजनीच्या ‘फुलवंती’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मनोरंजन September 21, 2024

अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता गश्मीर महाजनी यांच्या ‘फुलवंती’ चित्रपटाची सध्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून प्राजक्ताच्या सुंदर नृत्याचं कौतुक होतं आहे. आता ‘फुलवंती’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून नेटकऱ्यांनी या अलौलिक कलाकृतीचं भरभरून कौतुक केलं आहे.

aarya jadhao on her wild card entry in Bigg boss marathi 5
30 / 30

आर्या जाधव वाईल्ड कार्ड म्हणून बिग बॉसमध्ये परतणार? तिनेच दिले उत्तर

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात आर्या जाधवने निक्की तांबोळीला मारल्यामुळे तिला शोमधून बाहेर काढण्यात आले. आर्याला प्रेक्षकांचा पाठिंबा असूनही तिला परत बोलावले गेले नाही. एका मुलाखतीत आर्याने सांगितले की, तिला परत बोलावले गेले नाही, पण प्रेक्षकांना तिचा गेम पाहायचा असल्यास ती परत यायला तयार आहे.