मुंबई उच्च न्यायालयात १३ पदांसाठी भरती; महिना एक लाखाहून अधिक पगार, ‘असा’ करा अर्ज
Bombay High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालयात विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. उच्च न्यायालयात मुख्य संपादक, संपादक, उपसंपादक, सहायक संपादक या पदाच्या एकूण १३ रिक्त जागा आहेत. या भरतीत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी त्यांचा ऑनलाईन अर्ज ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमा करायचे आहेत. कंत्राटी पद्धतीने ही भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे तुम्हीही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर आधी शैक्षणिक पात्रता, वय, पगार यांसह इतर आवश्यक गोष्टींची माहिती करून घ्यावी.