UPSC परिक्षेत झाला नापास, मग सुरू केला ‘चाय सुट्टा बार’चा व्यवसाय, आता कमावतो कोटी रुपये
Success Story of Anubhav Dubey: जर तुमच्या शहरात चाय सुट्टा बारचे आउटलेट असेल, तर कदाचित तुम्हीही तुमच्या मित्रांसोबत तिथे चहाचा आस्वाद घेतला असेल. २०१६ पूर्वी कोणीही विचार केला नव्हता की चहा विकण्याचा व्यवसाय इतका यशस्वी होऊ शकतो. आयआयटी, आयआयएम किंवा यूपीएससी सारख्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच यश मिळते असे लोक मानतात, परंतु अनुभव दुबेची कहाणी या विचारसरणीला मात देते. चाय सुट्टा बारचे सह-संस्थापक अनुभव दुबे यांचा प्रवास धैर्य, कठोर परिश्रम आणि उद्योजकतेचे उदाहरण आहे.