मुलांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
मुलांना केवळ चांगले शिक्षणच नाही, तर चांगले संस्कारही महत्त्वाचे आहेत, कारण- हीच मुलं उद्याचं भविष्य असतात. त्यामुळे पालकांनी मुलांना लहान वयातच चांगल्या-वाईट गोष्टींची शिकवण दिली पाहिजे. त्यांचे चांगले संगोपन केले पाहिजे. कारण- जेव्हा ही मुलं मोठी होतात तेव्हा त्यांचं वागणं, बोलणं व संस्कार यावरून समाज त्यांना ओळखतो. त्यामुळे मुलं लहान वयात ज्या चुका करतात, त्याकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये. तीन वर्षांनंतर पालकांनी आपल्या मुलांना कोणत्या चांगल्या आणि महत्त्वाच्या गोष्टी शिकवणं गरजेचं आहे ते जाणून घेऊ…