भारतीय सैन्यात एनसीसी उमेदवारांसाठी मोठी संधी! इतक्या जागांसाठी भरती सुरु, कसा कराल अर्ज
भारतीय सैन्य दलात एनसीसीच्या उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. NCC स्पेशल एन्ट्री स्कीम- ऑक्टोबर २०२५ अंतर्गत ही भरती राबवली जात आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट http://www.joinindianarmy.nic.in वर देखील सुरू झाली आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी १५ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. पण अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि रिक्त जागांसंदर्भातील तपशील जाणून घ्या.