कोकण रेल्वेत १० वी, १२ वी ते पदवीधरांना नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी भरती होणार सुरु
Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेत नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे, कारण भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे विभागात अनेक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यानुसार, वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हिल/इलेक्ट्रिकल), स्टेशन मास्टर, कमर्शियल पर्यवेक्षक पदासह काही इतर पदांच्या १९० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.