Maharashta HSC Result 2025 : बारावीचा निकाल कधी लागणार? कसा पाहाल? समोर आली मोठी अपडेट
Maharashtra Board HSC Result 2025 Date Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) बारावीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षांच्या निकालाचं काम सध्या अंतिम टप्प्यात सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आता आपल्या उत्तरपत्रिकांचे नेमके कसे मूल्यांकन होणार आणि तो निकाल कधी जाहीर होणार याबाबत धाकधूक आहे. पण, आता निकालाची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण- बारावीच्या बोर्डाचा निकाल कधी लागणार? याबाबतची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.