फसवणूक झाल्यानंतर सुचली कल्पना, उभारली कोटींची कंपनी; शार्क टॅंककडून मिळाली मोठी डील
प्रत्युषा वेमुरी ही मुंबईची रहिवासी आहे. ती सायबर सुरक्षातज्ज्ञ आहे. तिने AI-आधारित सायबर सुरक्षा फर्म raptorX.ai (पूर्वी Panoplia.io) सुरू केली आहे. ही फर्म व्यवसायांना सायबर मालवेअर आणि फसवणुकीपासून संरक्षित करण्यात मदत करते. मे २०२३ मध्ये लाँच झालेल्या या कंपनीने शार्क टँक इंडिया सीझन ३ मध्ये आपली उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर २.५ टक्के इक्विटीच्या बदल्यात एक कोटी रुपयांचा सौदा त्यांनी केला होता.