स्टेट बँकेत १५११ रिक्त पदांसाठी भरती, पगार ९३ हजार; पण ‘हेच’ उमेदवार करु शकतात अर्ज
सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे भारतातील सर्वात मोठ्या बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने अनेक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यासाठी स्टेट बँकेने भरतीची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे, ज्यानुसार उमेदवारांसाठी १४ सप्टेंबर २०२४ पासून sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून जवळपास १५११ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.